स्थापत्यशास्त्रातील एक कोड – त्रिशुंड गणपती भाग २

त्रिशुंड गणपती मंदिर हे पूर्वाभिमुख आहे, मंदिराच्या रचनेवर राजस्थानी माळवा व दक्षिणात्य स्थापत्यशैलीचा प्रभाव आहे. अंगण सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह अशी साधारणतः मंदिराची रचना आहे, मंदिर हे मुळातच थोड्या उंच जोत्यावर बांधलेले आहे, कारण मंदिराखाली तळघर आहे. मंदिर जमिनीपासून साडेतीन फूट उंच चौथर्‍यावर आहे गाभाऱ्यात प्रवेश करण्याआधी तीन दरवाजातून जावे लागते.

मुख्य दर्शन प्रथम दरवाजा

मंदिराचे मुखदर्शन बऱ्याच शिल्पकृतींनी सजवलेले आहे, दरवाजाच्या दोन्ही बाजूला द्वारपाल कोरलेले आहेत द्वार शाखेच्या मधोमध गणपतीची छोटी मूर्ती कोरलेली आहे. मूर्तीच्या खाली गणेश यंत्र कोरलेले आहे; द्वार शाखेच्या वरच्या बाजूला असलेल्या शिल्पामध्ये दोन्ही बाजूला लक्षमीला अभिषेक करणारे हत्ती म्हणजेच गजलक्ष्मी ची प्रतिमा कोरलेली आहे. त्याच्या बाजूस मकरमुखातून बाहेर पडलेली एक महिला आणि त्यावर पिसारा फुलवलेला मोर व त्या बाजूस आणखी दोन मोर आहेत महिरपाच्या बाजूला अनेक कपी माकड एकमेकांचे हात धरून उभे आहेत असे दाखवलेले आहे. महिरपाच्या वरच्या पट्टीतील एका शिल्पात एका साधूने दुसऱ्या साधूस स्वतःच्या डोक्यावर उलटे पकडलेले आहे, हृदय रोगाची साधना करणारे हे साधू गोसावी परंपरेतील आहेत हे स्पष्टच आहे. याचबरोबर काही यक्ष किन्नर इत्यादी कोरले आहेत, मुखदर्शनाच्या सर्वात वरच्या भागावर विष्णूची मूर्ती कोरली आहे येथे अनेक घट पल्लवासारखी चिन्हे आढळतात.

मुख्य दर्शनावरील सर्वात रंजक शिल्प म्हणजे बंगाल व आसामच्या वैभवाचे प्रतीक असलेला गेंडा यास तीन इंग्रजी अधिकारी यांनी साखळदंडाने बांधून ठेवले आहे व त्याखाली अर्ध उठावातील मोठे मोठे हत्ती एकमेकांशी लढतानाचे शिल्प आहे. १८५७ च्या प्लासीच्या युद्धात ब्रिटिशांनी बंगाल वसांपर्यंतचा ताबा घेतला व त्यानंतर कंपनी भारतभर आपले पाय पसरू लागली या कटू परिस्थितीची जाणीव येथील जनतेला व राजांना करून देणारे शिल्प आहे.
याच पहिल्या दरवाजाच्या उंबरठ्याच्या शेजारी दोन्ही बाजूला तळघरात जाण्याचा मार्ग आहे वर्षभर ते बंद असतात गुरु पौर्णिमेला यापैकी एक दरवाजा दर्शनासाठी उघडला जातो.

सभा मंडप

सभा मंडपाचे छत कोसळून गेल्यामुळे ते कसे असणार हे जाणून घेण्याचा मार्ग नाही मंडवाच्या भिंतीला कोण आले आहेत; अंतराळात जाण्याच्या दरवाजावर गजलक्ष्मीचे चित्र आहे या शिल्पा जवळ पोपटांचे शिल्प कोरलेले आहे.
अंतराळ या डावीकडून व उजवीकडून प्रदक्षिणा घालण्यासाठी दोन दरवाजे आहेत, दरवाजा वर उजव्या सोंडेचा हत्ती कोरलेला आहे, तसेच खाली गणेश यंत्र आहे, दरवाजाच्या वरती शिव व त्याचे एका मांडीवर पार्वती आणि दुसऱ्या मांडीवर स्त्रीरुपी गंगा नदी बसलेली आहेत. शिवाचे एका बाजूला त्याचे वाहन नंदी व दुसऱ्या बाजूला पार्वतीचे वाहन सिंह कोरलेले आहेत, यावरून हे मूळ शंकराचे मंदिर होते या तारकाला पुष्टी मिळते.

शिलालेख
मूर्तीच्या वरच्या बाजूस तीन शिलालेख आहेत यांचे वाचन डॉक्टर ग ह खरे यांनी केले आहे.

पहिल्या शिलालेखात २० नोव्हेंबर १७५४ ला मंदिराचे बांधकाम चालू झाले असा उल्लेख आहे व या ठिकाणी महाकाल रामेश्वर यांची स्थापना केली असा उल्लेख आहे यावरून मंदिर महादेवाचे आहे हे  सिद्ध होते.

दुसऱ्या शिलालेखात संस्कृत भाषेत शिवाजी व कालाची स्तुती केली आहे व शेवटी गीतेचा श्लोक दिला आहे तिसऱ्या शिलालेखा फारसी भाषेत असून त्यामध्ये ठिकाण फकीर गुरुदेव दत्ताचे घर आहे व येथे २६ ऑगस्ट १७५४ अशी तारीख आढळते.गाभारा

मंदिराच्या गाभार्‍यात तीन सोंड असलेल्या गणपतीची मूर्ती मोरावर विराजमान आहे, मोराने चोचित नाग धरला आहे गणपतीच्या मुकुटावर सुद्धा नागाचे वेटोळे आहे. मूर्तीच्या माहेरापावर छिद्रे आहेत गणपतीच्या कानात सुद्धा पूर्वी त्यात दागिने घातले जात असावेत गणपतीला सहा हात आहेत त्यात शुल अंकुश पाश परशु आहेत. गणपतीच्या एका उजव्या हातात मोदकाचे भांडे आहे तर दुसऱ्या उजव्या हाताने मांडीवर बसलेल्या देवीला आधार दिलेला आहे.

सुमारे पाऊण मीटर उंचीच्या गणपतीच्या डाव्या मांडीवर शक्ती बसली आहे डावी सोंड शक्तीच्या हनवटीला स्पर्श करते उजवी सोंड हातातील मोदकांच्या भांड्यातील मोदकांना स्पर्श करत आहे. मधली सोंड गणपतीच्या पोटावरून मोराच्या डोक्याला स्पर्श करते मोराच्या उजवीकडे उंदीर व डावीकडे एका स्त्री भक्ताचे शिल्प आहे.

गणपतीच्या मागच्या भिंतीवर विष्णूचे शिल्प आहे व त्यावर गणेश यंत्र व त्याच्या बाजूला चंद्र व सूर्य यांच्या प्रतिमा कोरले आहेत. गाभाऱ्याच्या उजव्या भिंतीतून तळघरात जाण्यास मार्ग आहे पुजारी रोज गणपतीच्या पूजेनंतर या मार्गाने सभाधिजवळील गणपतीला दिवा लावतात.तळघर
तळघरात श्री दत्तगुरु गोसावी महाराज यांची समाधी आहे, गणेश मूर्तीला अभिषेक केला की समाधीवर पाणी उघडते तळघरात योग्याची पाठशाला चालावी अशी योजना होती. सर्व दिनचर्यांची सोय तळघरत होती प्रातर्विधी साठी नागझरी जवळ जाण्यास भुयारी पाऊलवाट होती तसेच काही भुयारी वाट

शेजारच्या विहिरीला सुद्धा जोडले आहेत. विहिरीच्या भिंतीत पाण्याच्या पातळीवर एका मोठी खोली होती येथे तंत्र साधकांच्या प्रमुख गुरुवर्यांसाठी स्नानाचा संगमरवरी चौरंग होता.

तळघरातील खोल्यांना दरवाजे व भिंतींना कोण आले आहेत खोलीच्या छताला दोन खात आहेत काहीतरी टांगण्यासाठी त्याचा उपयोग होत असावा.बाह्य भिंती

 बाह्य भिंतींवर खूप कोरीव काम नसले तरी काही शिल्पे कोरली आहेत. मंदिराच्या दक्षिण भिंतीला नटराज्याची सुबकमुर्ती आहे तर पश्चिमेकडील देव कोष्टात लिंगोद भाऊ शिव हे पुराणातील कथेवर आधारित शिल्प आहे. भारतातील विशेषतः दक्षिण भारतातील मंदिरात लोकप्रिय असलेले हे चित्र येथे वेगळ्या स्वरूपात आहे. कथेनुसार एकदा ब्रह्म आणि विष्णू मध्ये कोण श्रेष्ठ यावरून वाद झाला हा वाद सोडवण्यासाठी ते महादेव शंकरांकडे गेले तर त्यांनी दोघांना त्यांच्या आदिलिंगाचा उदय व अंत शोधण्यास सांगितले, ते ब्रम्हदेवांनी हंसाचे रूप घेऊन आकाशात गेले तर विष्णूजींनी वराहाचे रूप घेऊन ते पातळात गेले दोघांनाही अंत व उगम सापडले नाही; मात्र ब्रह्मांनी शंकराकडे येऊन सांगितले की त्यांना उगम मिळाला व विष्णुजींनी मान्य केले की त्यांना अंत मिळाला नाही. तेव्हा महादेव शंकरांनी त्या शिवलिंगातून प्रकट होऊन ब्रम्हदेवांना शाप दिला की भारतातून त्यांची पूजा बंद होईल. या कथेनुसार शिल्पाच्या वरच्या टोकाला हंस खाली वराह आणि वरच्या बाजूस चतुर्भुज शिवलिंग आहे उत्तरेच्या देवकुष्टात चतुर्भुज भरव मूर्ती आहे.

संदर्भ

शिलालेखांच्या विश्वात – महेश तेंडुलकर

IMG_20221009_172305