Blogs

रायरेश्वराचं किल्ला, इतिहासाचं अभिमान, हे स्थान वीर शिवाजींचं, भूषण महाराष्ट्राचं
३७७ वर्षांपासून स्वराज्याच्या महोत्सव साजरा करणारा गड कडे रांगडे सह्याद्रीचे, जशी पहाडी छाती, जोश तांबड्या मातीचा,टिळा जणू लल्लाटी. याच सह्याद्रीच्या तांबड्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली ते ठिकाण म्हणजे ‘रायरेश्वर’ यालाच साक्षी मानून महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला. ‘रायरेश्वर’ हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून याचे पुण्यापासूनचे अंतर ८७ किलोमीटर एवढे आहे येथे पोहोचण्यासाठी […]
स्वराज्याचा बिनीचा शिलेदार रोहिडा
पुणे जिल्ह्यातील भोर शहराच्या दक्षिणेस सुमारे सहा किलोमीटर अंतरावर वसलेला लहानसा मात्र तितकाच मजबूत किल्ला म्हणजे रोहिडा किल्ला यालाच विचित्रगड व बिनीचा किल्ला असेही म्हणतात. या किल्ल्याची निर्मिती यादवकालीन आहे. अनेक वर्षे हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात असल्याचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६४८ मध्ये जिंकून घेतला व या लढाईनंतर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल […]
मनाला मोहणारा मोहनगड
मोहन गड नाव बऱ्याच लोकांना कदाचित माहीत नसेल, कारण तुम्ही आम्ही सगळेच बऱ्याचदा याचा उच्चार केंजळगड असा करतो. तब्बल सव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला हा रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोंगर रंगांमध्ये आहे. रोहिड्याची डोंगररांग उतरताना नैऋत्य दिशेला एका भल्या मोठ्या पहाडाच्या डोक्यावर गांधी टोपीच्या आकाराचा केंजळगड अधून मधून दर्शन देतो. यालाच केळंजा […]
स्थापत्यशास्त्रातील एक कोड – त्रिशुंड गणपती भाग १
सांस्कृतिक राजधानीतील सर्वात महत्त्वाचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव तसे येथे सर्वच उत्सव मोठ्या थाटात साजरे केले जातात, मात्र गणेशोत्सवाची गोष्टच वेगळी आहे. दगडूशेठ हलवाई गणपती असो की मानाचे पाच गणपती अगदी गल्ली गल्लीतील सर्वच काही ना काही इतिहास सांगतात, असेच एक अत्यंत महत्त्वाचे व ऐतिहासिक गुढ साधून असलेले अठराव्या शतकातील एक गणेश मंदिर पुण्याच्या सोमवार पेठेत […]
स्थापत्यशास्त्रातील एक कोड – त्रिशुंड गणपती भाग २
त्रिशुंड गणपती मंदिर हे पूर्वाभिमुख आहे, मंदिराच्या रचनेवर राजस्थानी माळवा व दक्षिणात्य स्थापत्यशैलीचा प्रभाव आहे. अंगण सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह अशी साधारणतः मंदिराची रचना आहे, मंदिर हे मुळातच थोड्या उंच जोत्यावर बांधलेले आहे, कारण मंदिराखाली तळघर आहे. मंदिर जमिनीपासून साडेतीन फूट उंच चौथर्‍यावर आहे गाभाऱ्यात प्रवेश करण्याआधी तीन दरवाजातून जावे लागते. मुख्य दर्शन प्रथम दरवाजा […]